सेलिब्रिटींनीही बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी – मावळ लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 29) शहरातील विविध सेलिब्रिटींना मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे राष्ट्रीय हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी आहे. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान अनिवार्य आहे, असे मत त्यांनी व्यक्‍त केले.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी निगडी-प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर दुपारी साडेचारच्या सुमारास कुटुंबियांसह मतदान केले. सोनाली म्हणाली, “मी शक्‍यतो सकाळीच मतदान करते. परंतु रात्रभर शूटींग असल्याने सकाळी पॅकअप करून मी मतदानासाठी आले. प्रत्येकाने मतदान करायला हवे. मतदान कोणाला द्यायचे यावर चर्चा, वाद होऊ शकतात. त्यालाच लोकशाही म्हणतात. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान अनिवार्य आहे.”

गायिका सावनी रवींद्र आणि शास्त्रीय गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी चिंचवड-श्रीधरनगर येथील एम.एस.एस. हायस्कुल (माटे हायस्कूल) येथे सकाळी मतदानाचा हक्क बजावला. सावनी म्हणाली, “मी मतदानासाठी खास मुंबई येथून प्रवास करून आले. प्रत्येकाने मतदान करणे आवश्‍यक आहे. तो आपला राष्ट्रीय हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी आहे.”
अभिनेत्री प्रियंका यादव हिने सकाळी साडेसातच्या सुमारास चिंचवडगाव येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालयात कुटुंबियांसह मतदान केले. अभिनेता भूषण प्रधान याने चिंचवड येथील महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.