आळंदी, दि.15 – शंकरराव होळंबे मामा यांची 14वी पुण्यतिथी आळंदीत साजरी करण्यात आली. खादगावचे रहिवाशी असलेले शंकरराव होळंबे यांची गंगाखेड तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख होती.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हरिपाठ, कीर्तन, आणि महाप्रसाद करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी ह.भ.प. गणेश महाराज फड, ह.भ.प. विठ्ठल महाराज उखळीकर, ह.भ.प. लक्ष्मण महाराज शेवाळे, रोहिदास म. उभे, ज्ञानेश्वर म. बोरूडे, रामकृष्ण म. बचाटे, वसंत महाराज शास्त्री, नामदेव महाराज, ह.भ.प. ढगे महाराज वारकरी शिक्षण संस्था, तारकेश्वर धर्मशाळा विद्यार्थी, ह.भ.प. गोदावरीबाई होळंबे, ह.भ.प. यमुनाबाई फड, बिभीषण कोल्हाळकर, नामदेव घुंडरे, ज्ञानेश्वर भाऊ पगडे, धुळगंड साहेब यांसह मोजके भाविक उपस्थित होते.