दिवाळी म्हटलं कि एक वेगळाच माहोल असतो. सर्वत्र चैतन्याच वातावरण असतं. अशीच दिवाळी मालिकांमध्ये सुद्धा घडताना दिसणार आहे. पण ह्या वेळेची दिवाळी सगळ्यांसाठीच थोडी वेगळी असणार आहे.
शनाया राधिका मसालेचीCEO झाल्यानंतरच तिच राधिकामसाले मध्ये पाहिलं लक्ष्मीपूजन आणि पहिला पाडवा असणार आहे. राधिका – आनंद भावोजी आणि शनाया – सौमित्र यांची भाऊबीज मालिकेत पाहायला मिळेल.
लॉकडाऊन नंतर शूट सुरु झाल्यापासून बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ यांच्या राहण्याची व्यवस्था सेटवरच करण्यांत आली होती आणि गेली ४ महिने सर्व crew सेटवरच होते. या सर्वांचा सन्मान म्हणून नवऱ्याची बायकोच्या टीम ने त्यांचा भेटवस्तू देऊन गौरव केला. ४ दिवसाची सुट्टी मिळाल्यामुळे सर्व मंडळी खुश आहेत कारण त्यांना ४ दिवस का होईना त्यांचा घरच्यांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणार आहे.
दरम्यान, यावर्षीची दिवाळी कलाकारांसाठीच नाही तर सर्वसामान्यांसाठीसुद्धा तणाव निर्माण करणारी जाणार आहे. मात्र याच तेजोमय दिवाळीत महामारीचा अंधार दूर होऊदे, अशीच सगळ्यांची देवाकडे प्रार्थना आहे.