शासनाच्या निर्बंधांचे पालन करत शिराळ्यात उत्सव संपन्न

नागपंचमी दिवशी सकाळी अंबा माता पूजन, तर दुपारी पालखी पूजन सोहळा पार पडला

शिराळा : शिराळ्यात पोलिसांच्या प्रचंड फौजफाटा उपस्थितीत अंबा माता पूजन, व पालखी पूजन करण्यात आले. या कालावधीत शिराळ्यात निरव शांतता होती. लाखोंच्या उपस्थिती, गजबजलेले शिराळा आज दिसले नाही.

सकाळी सम्राट सिंह शिंदे, संभाजी गायकवाड, पुजारी आनंदराव गुरव, व त्यांच्या पत्नी आणि सचिन कोतवाल  फक्त या 5 जणांनी अंबा मातेचे पूजन केले. यावेळी मंदिर परिसर व शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. सकाळी अंबा माता मंदिरातील अंबा मातेचे पूजन झाल्यानंतर दुपारी अंबामाता मंदिर व लक्ष्‍मण महाजन यांचे घरी पालखी पूजन विधी पार पाडण्यात आला.

दुपारी 3 वाजता पालखी महाजनांचे घरी पोहोचली. यावेळी लक्ष्‍मण महाजन यांचे घरी पालखी पूजन करण्यात आले. अनिरुद्ध महाजन यांनी पालखी पूजन केले. यावेळी सुमंत महाजन, सुखदा महाजन, प्रणव महाजन, अनुजा महाजन, यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाचे निर्देशानुसार पालखी सोहळ्यासाठी सम्राट सिंह शिंदे, संभाजी गायकवाड, पांडुरंग महाजन, श्रेयस महाजन, अथर्व महाजन, बाबासो नलवडे, काशिनाथ नलवडे, अक्षय नलवडे, सागर कोतवाल, व संदीप कोतवाल यांनी पालखी सोहळ्याचे काम पाहिले. दुपारी तीन वाजता पालखी महाजनांचे घरी पोहोचली.

यावेळी लक्ष्‍मण महाजन यांचे घरी पालखी पूजन करण्यात आले अनिरुद्ध महाजन यांनी पालखी पूजन केले. यावेळी सुमंत महाजन, सुखदा महाजन, प्रणव महाजन, अनुजा महाजन, यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाचे निर्देशानुसार पालखी सोहळ्यासाठी सम्राट सिंह शिंदे, संभाजी गायकवाड, पांडुरंग महाजन, श्रेयस महाजन, अथर्व महाजन, बाबासो नलवडे, काशिनाथ नलवडे, अक्षय नलवडे, सागर कोतवाल, व संदीप कोतवाल, यांनी पालखी पूजन सोहळा पार पाडला.

या कालावधीत शिराळ्यात सर्वत्र शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस, वनखाते, महसूल विभागाने, शिराळा परिसर व शिराळा शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता ड्रोन कॅमेरा द्वारे सर्व प्रक्रियेवर नजर ठेवण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व शासन निर्देश यामुळे शिराळकरांनीही शासन निर्देशांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र शेकडो वर्षांच्या इतिहासात शिराळा शहर आज वेगळेच दिसत होते हे वास्तव आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.