आईच्या वाढदिवशी संजय दत्त कडून जुन्या आठवणींना उजाळा

मुंबई- आज दिवंगत अभिनेत्री ‘नर्गिस’ यांचा वाढदिवस आहे. कलाविश्वात आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनावर नर्गिस यांनी अधिराज्य गाजवलं आहे. नर्गिस यांचा जन्म 1 जून 1929 रोजी झाला असून, 1981 मध्ये कॅन्सरमुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आपल्या आईच्या वाढदिवशी त्यांच्या लहानपणीचा एक सुंदर फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. संजू बाबाने हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोत नर्गिसजी संजय दत्त आणि प्रिया दत्त या आपल्या दोन मुलांशी खेळताना दिसतायेत. संजू बाबाने शेअर केलेल्या या फोटोवर आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.