वाघोली (पुणे) – भारतीय जनता पक्ष स्थापना दिनानिमित्त आव्हाळवाडी (ता. हवेली) येथे भाजप कार्यकर्त्यांनी घरावर पक्षाचा झेंडा लावून पूजा करून स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब बबनराव सातव पाटील यांनी सांगितले की, भाजप पक्षाच्या वतीने सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी देशात तसेच राज्यात भाजप व मित्र पक्षाच्या वतीने योग्य भूमिका बजावली जात आहे. सामान्य नागरिकांचा पक्षावरील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच पक्षाचा स्थापना दिवस गुढीपाडवा सणाप्रमाणे भाजप कार्यकर्ता साजरा करत असल्याचे सातव यांनी सांगितले.
यावेळी आव्हाळवाडीच्या माजी उपसरपंच सुरेखा दादासाहेब सातव पाटील, रामराजे सातव पाटील, हर्षदा सातव पाटील, नेहा झरांडे आदी उपस्थित होते.