करोनाच्या संकटामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साधेपणाने साजरी

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर मधील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर, समरजितसिंह घाटगे, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.