पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरीच साजरी करा…

प्रा. राम शिंदे युवा मंच महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग माने यांचे आवाहन

जामखेड (प्रतिनिधी) :- समस्त धनगर समाजासह बहुजन बांधवांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची रविवार दि. 31 मे 295 वी जयंती घरोघरीच अगदी साध्या पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन प्रा.राम शिंदे यांनी केलेले होते. त्याअनुषंगाने प्रा. राम शिंदे युवा मंच महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग माने यांनी सर्व समाजाला पुन्हा आवाहन केले आहे.

ते पुढे म्हणाले की येत्या रविवारी 31 मे रोजी दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात जयंती महोत्सव साजरे केले जातात. पण यावर्षी कोरोनाच्या महाभयंकर महामारीने जगभर थैमान घातले आहे. देशात सर्वञ हाहाकार माजला असून कोरोनाच्या संसर्गजन्य परीस्थितीमुळे गेली दोन अडिच महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे सर्वच सार्वजनिक उत्सव, जयंती, जञा आदी कार्यक्रम शासनाच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे. आणि हे सर्व अटी, नियम आपल्या सुरक्षिततेसाठी घालण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षीच्या जयंती दिनी कसल्याही प्रकारचा मोठा उत्सव न करता व शासनाच्या नियमाचे उल्लंघन न करता अगदी साध्या पध्दतीने साजरी करावी.

ज्याप्रमाणे आंबेडकर जयंती, शिवमहोत्सव,संभाजी राजे जयंती, बसवेश्वर जयंती, आदी महापुरुषांचे जयंतीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी न करता आपापल्या घरीच साजरे केले आहेत. त्याचप्रमाणे आपणही यावर्षी 31 मे रोजी होणारी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती महोत्सव (जन्मोत्सव) प्रत्येकांनी आपापल्या घरी पारंपारीक पध्दतीने मनोभावे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतीमेचे पुजन करुन आनंदाने साजरी करण्यात यावी असे आवाहन प्रा. राम शिंदे युवा मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग माने यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.