काऱ्हाटी – सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत महामार्ग पोलीस केंद्र, बारामती येथील पोलीस उपनिरीक्षक द्वारका डोखे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
रयाप्रसंगी पोलीस नाईक साळुंखे व पोलीस कॉन्स्टेबल तापसे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर नांदगुडे यांनी केले. आभार प्रा. अमोल भोसले यांनी मानले.