सातारा, कराडमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

जिल्ह्यात 248 ठिकाणी नमाज पठण; मिठाई, भेटवस्तूंनी फुलल्या बाजारपेठासातारा, कराडमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

सातारा – प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक असलेली रमजान ईद साताऱ्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवारी सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी सामुदायिक नमाज झाल्यानंतर सर्वधर्मीयांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सातारा शहरातील विविध मशिदीमध्ये मुस्लीम बांधवांनी नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
एक महिन्याचे रोजा बुधवारी संपल्यामुळे जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांनी ईद उत्साहात साजरी केली. रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व मशिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी “ईद मुबारक’ असे शुभेच्छांचे फलक लावण्यात आले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मुस्लीम बांधवांनी शहरातील विविध मशिदीमध्ये एकत्र जमून नमाज पठण केले.

सातारा शहरातील पोवई नाका मस्जिद, एस. टी. स्टॅंड मस्जिद, पोलीस हेडक्वार्टर मस्जिद, शाही मस्जिद, मर्कज (खड़ा मस्जिद), कसाब मस्जिद (गुरुवार परज), मदीना मस्जिद (शनिवारा), मक्का मस्जिद (बुधवारा), बेगम म मस्जिद (माची पेठ), संगमनगर मस्जिद, पिरवाड़ी मस्जिद, मस्जिदे अक्‍सा (मंगळवारा ) सत्वशीलनगर, चॉंदतारा, कमाठीपुरा, इब्राहिमभाई जर्दा (जुनी एम.आय.डी.सी.), बिलाल (करंजे) कब्रस्तान मस्जिद, जामे मस्जिद, सदरबझार मस्जिद मस्जिदे आयेशा, पापाभाई कॉलनी, वखार मस्जिद (एम.आय.डी.सी.) कोडोली येथे रमजान ईदनिमित्तचे मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले. या बांधवांनी इदगी देऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येक मशिदीच्या परिसरात पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केली होती. रमजाननिमित्त बाजारपेठाही विविध मिठाई तसेच भेटवस्तूंनी फुलल्या होत्या. सातारा, कराड, वाई, फलटण या शहरांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूनण248 ठिकाणी मोठ्या उत्साहात नमाज पठण केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.