‘या’ अनोख्या शुभेच्छा देत साजरा करा रक्षाबंधन

रक्षाबंधन भावा-बहिणीच्या अतूट प्रेम-नात्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते. या दिनानिमित्त काही खास मेसेज आपल्या बहिणी आणि भावांना पाठवा.

तुझ्या आगमनाने मी झालो खऱ्या अर्थाने भाऊ…

भरवलास मला तुझ्या हिश्याचा खाऊ…
फिरवलेस माझ्या जखमांवर हात तुझे मऊ …

तुझ्याशिवाय मी नाहीच शकत राहू…

तुला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा..!!!

– सुगतकुमार जोगदंड


बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी
बांधिते भाउराया आज तुझ्या हाती औक्षिते प्रेमाने,
उजळुनी दीपज्योति रक्षाने मज सदैव,
अन् फुलावी प्रीती बंधन असूनही,
बंधन हे थोडेच या तर अहळन्या रेशीमगाठ़ी..


फक्त भाऊच असतो जो वडीलांसारखं प्रेम
आणि आई सारखी काळजी करतो..


भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझ माझ जमेना आणि
तुझ्यावाचून करमेना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा..!!!


जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते,
नेहमी माझ्या मनाला दादाला भेटण्याची आस असते.


नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ,
मी सदैव जपलंय हरवलेले ते गोड दिवस,
त्याच्या मधुर आठवणी आज सारं सारं आठवलंय
हातातल्या राखीसोबताच ताड़ तुझ प्रेम मनी मी साठवलंय..


काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील….
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल….


सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे….
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…..


राखी आपलं नातं जोडणारा एक रेशीम धागा  

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.