पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोजागरी पौर्णिमेनिमित्त गुरूवारी ( दि.१६ ) शहरातील उद्यानांच्या वेळांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या दिवशी नागरिकांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत महापालिकेची उद्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत.
ही माहिती मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली. महापालिकेची शहरात २११ उद्याने आहेत. या उद्यानांची दररोजची वेळ सकाळी सहा ते दहा आणि रात्री साडेचार ते साडे आठ वाजेपर्यंत असते.
मात्र, दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला नागरिक मोठ्या प्रमाणात उद्यानात येतात. त्यामुळे महापालिकेकडून गरुवारी उद्यानांची वेळ सायंकाळी ४.३० ते रात्री १२.०० पर्यंत असणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.