उस्मानाबाद : जि. प. प्रा. शाळा बंगाळवाडी ता.परांडा या शाळेमध्ये अनोखी होळी साजरी केली आहे. निसर्गातील झाडांची वृक्षतोड न करता शाळा व शाळेच्या परिसरातील केर कचरा गोळा करून होळी साजरी करण्यात आली.
मुलांना भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, मावा गुटका , दारू इत्यादींपासून दूर राहण्यापासून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विश्वास गायकवाड , शिक्षक राजेंद्र गाढवे आणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बजरंग गोडसे, उपाध्यक्ष शिवाजी सूर्यवंशी, ग्रामपंचायतीचे सदस्य सुनिता सूर्यवंशी आदी उपस्थित होते.