पुणे – दिवाळी जवळ आली की, मित्रांना, आप्तांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या मेसेजेसची शोधाशोध सुरू होते. अशावेळी या अनोख्या शुभेच्छा देऊन आपल्या कुटूंबियांसह मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देऊ शकता.
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पीडा जाऊ दे , बळीच राज्य येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
आज नरकचतुर्दशी!
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा!
अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो!
आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो..
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि
भरभराटीची जावो..
नरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
अंगणात तुळस,
आणी शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!