मुंबई- आज संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. दिवाळीमध्ये सर्वजण एकत्र येतात आणि हा सण आनंदाने साजरा करतात. त्यामुळे दिवाळीसणाला आपण आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढण्याचा आणि आपल्या घरच्यांसोबत राहण्याचा प्रयत्न करतो.
या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांनी देखील आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडिया आकाउंटवरून काही फोटो शेअर केले असून, आपल्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांना यकृताच्या त्रासामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
T 3530 – Diwali greetings to all .. peace prosperity and fulfilment ..?
दीपावली की अनेक अनेक शुभकामनाएँ ; सुख शांति समृद्धि , सदा ?( please accept this as a response to all the greetings received ; it will be impossible to reply to each individually ) pic.twitter.com/JZmOkyoOY8
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 26, 2019