आरोग्यपूर्ण दिवाळी साजरी करा

दसरा या सणानंतर काही आठवड्यांसाठी शरीर डीटॉक्‍सीफाय करणे अत्यावश्‍यक आहे, कारण त्यामुळे तुमची एकूणच सिस्टम सुधारेल आणि तुम्हाला हलके-फुलके वाटेल. दिवाळी हा एक असा भारतीय सण आहे, जो मिठाई, खमंग फराळ आणि इतर चविष्ट पदार्थांसाठी ओळखला जातो.

दिवाळीनंतर पोट जड वाटणे, बद्धकोष्ठ होणे किंवा पचनाशी संबंधित इतर समस्या होणे अगदी स्वाभाविक असते. त्यामुळे आधीपासूनच काही शारीरिक समस्या असतील अशा लोकांना आणि वजन कमी करण्याच्या खटपटी करणाऱ्यांना अशा वेळी अधिक ताण जाणवू शकतो व या भीतीपोटी ते सणाचा आनंद देखील मोकळेपणी घेऊ शकत नाहीत.

दिवाळी म्हणजे असा प्रसंग, जेव्हा तुम्ही तुमचे स्वकीय आणि मित्र यांच्यासोबत आनंद साजरा करता, खाण्यापिण्याची रेलचेल असते. अशाने साखर, तळलेले पदार्थ आणि इतर अखाद्य पदार्थांचा पोटावर मारा होत असतो. तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या या शरीरातील टॉक्‍झिन्सचा निचरा करून शरीर स्वच्छ करणे आवश्‍यक असते.

या सणानंतर काही आठवड्यांसाठी शरीर डीटॉक्‍सीफाय करणे अत्यावश्‍यक आहे, कारण त्यामुळे तुमची एकूणच सिस्टम सुधारेल आणि तुम्हाला हलके-फुलके वाटेल. सात दिवसांच्या डीटॉक्‍सीकेशन उपचारांनी तुमचे शरीर स्वच्छ होते आणि स्वास्थ्याची पुन्हा प्राप्ती होते. त्यामुळे मोकळ्या मनाने दिवाळीचा आनंद उपभोगा आणि त्याचबरोबर डीटॉक्‍स प्रोग्राम देखील आखून ठेवा.

आरोग्याची काळजी घेऊन सणाचा आनंद कसा घेता येईल, याबाबत काही टिप्स…

सणासुदीचा मनसोक्‍त आनंद घेण्याचा एकमात्र मार्ग म्हणून तंदुरुस्त आणि रोगमुक्‍त राहणे. तुम्हाला जे खावेसे वाटेल ते खा पण मर्यादित प्रमाणात. पारंपरिक मिठाई आणि फराळ यामध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यामुळे बेताचे खाणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. खाद्यपदार्थाची निवड योग्य करा आणि जादा खाऊ नका. तसेच, बाजारातून मिठाई खरेदी करण्याऐवजी घरीच मिठाई आणि फराळचे पदार्थ बनवा. त्यामुळे साखर आणि मिठाचे प्रमाण नियंत्रित राहील. त्यातदेखील अधिक आरोग्यदायक असे पर्याय निवडा.

मधुमेह किंवा आणि काही इतर वैद्यकीय समस्या असणाऱ्यांसाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. दिवसाला 10 ते 15 ग्लास पाणी प्यायल्याने तुम्ही खाल्लेल्या अतिरिक्त तेलाचा निचरा होईल. व्यायामाने चमत्कार होऊ शकतात. नियमितपणे जलद चालणे किंवा धावणे हा व्यायाम करू शकता, ज्यामुळे सणासुदीला जे आरोग्याला हानिकारक असलेले खाद्यपदार्थ तुम्ही खाता, त्याचे संतुलन होते.

शरीराचे क्‍लिन्सिंग आणि डीटॉक्‍सीफाइंग करण्यासाठी ग्रीन टी खरोखर लाभदायक ठरू शकतो. नेहमीचा चहा टाळून दररोज तीन ते चार कप ग्रीन टी प्यायल्याने फायदा होईल. यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्‍सिन्स निघून जाण्यास मदत होईल आणि तुम्हाला तरतरीत वाटेल.

(लेखिका निर्वाणा नॅचरोपॅथीच्या वैद्यकीय मार्गदर्शक आहेत.) – डॉ. सुनीता

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)