पुणे : दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेबाबत अखेर पावले उचलण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे स्टेशन येथे बॉम्बच्या अफवेने खळबळ उडाली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेतील फोलपणा चव्हाट्यावर आला होता.
पुणे रेल्वे विभागाच्या नवनीयुक्त मंडल रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची शुक्रवारी पहिली बैठक पार पडली. यात पुणे विभागात सुरू असलेल्या विविध कार्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी सदस्यांना दिली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, ब्रिजेशकुमार सिंग, प्रकाश उपाध्याय, श्याम कुलकर्णी आणि रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुनील मोदी, निखील काची, गोपाल तिवारी, विनीत पाटील, सुरेश माने, बशीर सुतार, आप्पासाहेब शिंदे, अजित चौगुले, किशोर बोरावत, शिवनाथ बियाणी, दिलीप बटवाल आदी उपस्थित होते. रेल्वे स्थानकावर सर्व ठिकाणी तत्काळ बसवावेत, अशी मागणी सदस्यांनीकेली होती.