दि.15 फेब्रुवारीपासून होणार परीक्षा
पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दि.15 फेब्रुवारीपासून या परीक्षा सुरू होणार आहेत.
परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दोन्ही वर्गांतील विद्यार्थ्यांची परीक्षेची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी दीड अशी ठेवण्यात आलेली आहे. सकाळी दहा वाजण्यापूर्वीच परीक्षार्थिंनी परीक्षा हॉलमध्ये पोहोचणे आवश्यक आहे. सकाळी 10 ते 10.15 वा. यावेळेत उत्तरपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.
सकाळी 10.15 ते 10.30 या वेळत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. सीबीएससीचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. सीबीएसईच्या संकेतस्तथळावरही ते उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे, असे बोर्डाने म्हटले आहे.
दहावी परीक्षेचे वेळापत्रक
दहावीच्या परीक्षा दि.15 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत. 26 फेब्रुवारी-इंग्रजी, 29 फेब्रुवारी-हिंदी, 4 मार्च-विज्ञान, 7 मार्च-संस्कृत, 12 मार्च -गणित, 18 मार्च-सामाजिक विज्ञान, 20 मार्च – माहिती आणि संप्रेशन तंत्रज्ञान आणि संगणक उपयोजन या विषयांसाठी परीक्षा होणार आहेत.
बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक
दि. 22 फेब्रुवारी-मानसशास्त्र, 27 फेब्रुवारी-इंग्रजी, 2 मार्च-भौतिकशास्त्र, 3 मार्च-इतिहास, 5 मार्च-अकाउंटन्सी, 6 मार्च-राज्यशास्त्र, 7 मार्च-रसायनशास्त्र, 13 मार्च-अर्थशास्त्र, 14 मार्च-जीवशास्त्र, 17 मार्च-गणित, 20 मार्च-हिंदी, 23 मार्च-भूगोल आणि 30 मार्च-समाजशास्त्र या विषयांसाठी परीक्षा होणार आहे.