सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीनंतरच

नवी दिल्ली – केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक देशातील शिक्षकांशी सीबीएसई परीक्षा 2021 आणि जेईई मेन परीक्षांविषयीच्या अडचणींबाबत संवाद साधत आहेत.

10 वी आणि 12 वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत होणार नसल्याची घोषणा रमेश पोखरियाल यांनी केली आहे. तसेच आतापर्यंत 4 लाख 80 हजार शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणाबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पोखरियाल यांनी यावेळी दिली.

परीक्षा रद्द करणे आणि विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करणं हे विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणीचे आणणारे ठरेल. नोकरी आणि प्रवेश मिळवताना पुढील काळात अडचणी निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द न करता पुढे ढकलल्या जातील. काही विद्यार्थ्यांना अजून समान संधी मिळत नाही. सध्या आपण ऑनलाइन क्‍लासेस घेत आहोत. मात्र, सध्याच्या परीक्षेत ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍य आहे, असे ते म्हणाले.

सीबीएसई परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जेईई मेन 2021 परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसमोर अधिक पर्याय उपलब्ध असतील. जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 90 प्रश्नांच्या दोन विभागातील फक्त 75 प्रश्न सोडवणे आवश्‍यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.