नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2021 साठीच्या बोर्ड परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. बोर्डाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, बारावीच्या फिजिक्सच्या पेपरची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार, 13 मे ला होणारी परीक्षा आता 8 जून 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय, इतिहास आणि बॅंकिंग परीक्षांची तारीखांमध्येही बदल करण्यात आला आहे. इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि गणित विषयाच्या पेपरची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार, इयत्ता दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर 21 मे रोजी आणि गणिताचा पेपर 02 जून रोजी होणार आहे.
परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून नवीन वेळापत्रक डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रामध्ये होणार आहे. वेळापत्रकानुसार, परीक्षा 4 मे 2021 पासून सुरू होईल.
10वी च्या परीक्षांचे वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
12 वी च्या परीक्षांचे वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.