बारावी सीबीएसईचा निकाल जाहीर; मुलींची बाजी

नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. बोर्डाच्या २०१८-१९ वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. गाझियाबादची हंसिका शुक्ला आणि मुझफ्फरनगरची करिष्मा अरोरा या देशात पहिल्या आल्या आहेत. हंसिका शुक्लाने ५०० पैकी ४९९ मार्क मिळवत पहिला नंबर मिळवला आहे.

देशभरातील बारावीचा निकाल ८३.४ टक्के इतका लागला आहे. ८८.७ टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवले असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचे प्रमाण ७९.५ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा निकालात वाढ झाली असून चेन्नई विभागाचा निकाल सर्वाधिक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.