माजी केंद्रीय मंत्री चौधरी यांना सीबीआयचे समन्स

नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते वाय.एस.चौधरी बॅंक फसवणूक प्रकरणावरून सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यांना चौकशीसाठी उद्या (शुक्रवार) सीबीआयच्या बंगळूरमधील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. इलेक्‍ट्रिकल सामग्री बनवणाऱ्या बेस्ट अँड क्रॉम्प्टन इंजिनियरींग प्रोजेक्‍टस्‌ लि. या कंपनीने 2017 मध्ये आंध्र बॅंकेची 71 कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यावरून त्या चेन्नईस्थित कंपनीविरोधात या आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या कंपनीशी संबंधित असल्याने चौधरी यांची चौकशी केली जाणार आहे. टीडीपी सत्तेवर असणाऱ्या आंध्र प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया आधीच समाप्त झाली आहे. मात्र, चौधरी यांना सीबीआयचे समन्स आल्यावरून तेथील राजकारण तापण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.