कोलकाता – पश्चिम बंगाल मधील सत्तारूढ तृणमुल कॉंग्रेसचे आमदार सुबोध अधिकारी आणि त्यांच्या बंधुंच्या घरावर सीबीआयने आज छापा टाकला. चीट फंड घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल असून त्या अनुषंगाने हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते.
आमदारांचे बिजपुर येथे ऑफिस आहे आणि तेथेच त्यांचे निवासस्थानही आहे. या दोन्ही ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. तसेच त्यांचे बंधु कमल अधिकारी यांच्या फ्लॅटवरही छापा टाकणत आला.
कमल अधिकारी हे कंचरापाडा नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत. (CBI raids TMC legislator Subodh Adhikari’s house in chit-fund scam case) या प्रकरणात सीबीआयने या आधीच तृणमुलचे नेते राजू सहानी यांना अटक केली आहे. ते हलिशहर नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत. सहानी यांच्या ताब्यातून 2 कोटी 75 लाख रूपयांची मालमत्ता आत्तापर्यंत जप्त करण्यात आली आहे.