सीबीआयच्या छापासत्रातून 190 कोटींची मालमत्ता उघड

नवी दिल्ली –सीबीआयने महिनाभरापूर्वी कॉम्प्युटर व्हायरसच्या नावाखाली मायक्रोसॉफ्टच्या ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यावेळी टाकण्यात आलेल्या छाप्यांतून संशयाच्या घेऱ्यात आलेल्या 6 कंपन्यांशी संबंधित 190 कोटी रूपयांची मालमत्ता उघडकीस आली आहे.

सीबीआयने 17 सप्टेंबरला सहा कंपन्यांशी संबंधित दिल्ली, राजस्थान आणि उत्तरप्रदेशातील ठिकाणांवर छापे टाकले होते. त्याविषयीचा तपशील शुक्रवारी देण्यात आला. छाप्यांवेळी 55 लाख रूपयांचे सोने, 25 लाख रूपयांची रोकड आणि डिजिटल पुरावे हस्तगत करण्यात आले.

कॉम्प्युटर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटशी संबंधित प्रकरण टेक्‍निकल सपोर्ट घोटाळा म्हणून ओळखले जात आहे. कॉम्प्युटरच्या प्रणालीत बिघाड असल्याचा किंवा व्हायरस शिरल्याचा मेसेज ग्राहकांना पाठवला जायचा.

प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या बिघाडासाठी किंवा व्हायरससाठी ग्राहकांकडून पैसे उकळले जायचे. त्याचा फटका अमेरिकेतील ग्राहकांनाही बसला. संबंधित घोटाळा उघड झाल्यानंतर सीबीआयने अमेरिका आणि इतर काही देशांच्या यंत्रणांशी समन्वय साधला. त्या तपासाची प्रशंसा अमेरिकेच्या न्याय विभागाकडूनही करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.