नवी दिल्ली – माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने आज पुन्हा एकदा छापेमारी केली आहे. देशमुखांच्या नागपुर आणि मुंबईतील ठिकाणी या छाप्याच्यावेळी शोध घेतला गेला.
ही छापेमारी कोणत्या आरोपांच्या अनुषंगाने झाली याची माहिती मात्र सीबीआयकडून देण्यात आलेली नाही. पदाचा दुरूपयोग, गुन्हेगारी स्वरूपाचा कट, आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये देशमुखांच्या विरोधात सीबीआयने आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
वाझेने केलेल्या आरोपांच्या संबंधातही त्यांच्यावर कारवाई सुरूच आहे. ईडीनेही त्यांच्याविरोधात कारवाई करून त्यांना अनेक वेळा समन्स जारी केली आहेत; पण या समन्सला त्यांनी अजून दाद दिलेली नाही. देशमुख यांचा ठावठिकाणाहीं बरेच दिवस कळलेला नाही.