भ्रष्टाचार, शस्त्रांची तस्करी प्रकरणी सीबीआयकडून 110 ठिकाणी छापे

नवी दिल्ली – भ्रष्टाचार, शस्त्रांची तस्करी आणि गुन्हेगारी गैरकृत्यांसंदर्भात सीबीआयने आज देशभरात 19 राज्यांमध्ये 110 ठिकाणी छापे घातले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली. सीबीआयने 30 नवी प्रकरणेही दाखल करून घेतली आहेत.

दिल्ली, मुंबई, चंदिगढ, जम्मू, श्रीनगर, पुणे, गोवा, रायपूर, हैदराबाद, मदुराई, कोलकाता, रौरकेला, रांची, बोकारो, लखनौ, कानपूर आणि उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश, उइत्तराखंड, ओडिशा, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि बिहारमधील अन्य काही ठिकाणीही छापे घातले आहेत. ज्या ठिकाणी सीबीआयने छापे घातले आहेत, तेथील तपशील ही कारवाई पूर्ण होईपर्यंत सीबीआयने गुप्त ठेवला आहे.

सीबीआयने एका आठवड्याभरात केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या मंगळवारीच सीबीआयने अशाच धडक कारवाईमध्ये बॅंक गैरव्यवहारांमधील आरोपींवर छापे घातले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.