तबलगी जमातविरोधात सीबीआय तपास सुरु

नवी दिल्ली : तबलगी जमातच्या आयोजकांकडून स्वीकारण्यात आलेल्या परदेशातील देणग्यांची प्राथमिक चौकशी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण पथकाने शुक्रवारी दिली.

तबलगी जमातचे आयोजक आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती बेकायदा मार्गाचा वापर करून आलेला परदेशी निधी गोळा करतात, अशा तक्रारी आहेत. त्याची प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे. या निधीच्या पावत्याही तबलगी जमातने प्रशासनाला सादर केल्या नाहीत. त्यामुळे परकीय चलन नियामक कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ही चौकशी करण्यात येत असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. तबलगींचा प्रमुख मौलाना साद आणि जमातच्या ट्रस्टला गेल्या महिन्या अंमलबजावणी संचनालयाने नोटीस बजावली होती.

अंमलबजावणी संचनालयाने जमातची कागदपत्रे आणि बॅंका तसेच वित्तीय अन्वेषण संस्थांकडील माहिती यांची पडताळण सिुरू केली आहे. त्यात अनेक ठिकाणी तफअवत आढळत आहे. हे प्रकरण दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवरून नोंदवण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांनी 541 परदेशी नागरिकांवर 12 आरोपत्रे नव्याने दाखल केल्यानंतर सीबीआयने कारवाईचा फास आवळण्यास सुरवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.