मानखंडना करण्यसाठीच माझी जेलवारी

पी. चिदंबरम यांची सर्वोच्च न्यायलयात कैफियत
नवी दिल्ली : सीबीआय आपली मानखंडना करण्यासाठी कोठडीत ठेवत आहे, असे आयएनएक्‍स मिडिया भ्रष्टाचार प्रकरणात जामीन मागणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले.

आयएनएक्‍स मिडिया भ्रष्टाचार प्रकरणात आर्थिक घोटाळ्याचा अथवा निधी घेतल्याचा कोणताही आरोप नाही. चिदंबरम यांनी अथवा त्यांच्या कुटुंबियांनी साक्षिदाराला भेटण्याचा प्रयत्न केल्याचा अथवा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा कोणताही आरोपही झालेला नाही, असे चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु संघवी यांनी सांगितले.

चिदंबरम यांना जामीन नाकारण्याच्या दिल्ली उच्च न्यायलयाच्या 30 सप्टेंबरच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. दिल्ली उच्च न्यायालयात पळून जाण्याची भीती, पुराव्यात फेरफार करण्याची भीती आणि साक्षिदारांवर प्रभाव टाकण्याची शक्‍यता या तीन मुद्यावर सीबीआयने विरोध केला होता. त्यापैकी परदेशी पळून जाण्याची भीती आणि पुराव्यात फेरफार करण्याची शक्‍यता न्यायलयाने फेटाळून लावली. मात्र साक्षिदारावर प्रभाव टाकण्याची शक्‍यता लक्षात घेऊन जामीन नाकारण्यात आला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.