नवी दिल्ली : अदाणी एन्टरप्रायजेस लि. आणि “नॅशनल कोऑपरेशन कन्झ्युमर्स’ फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि माजी व्यवस्थापकीय संचालकांविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
हे प्रकरण आंध्र प्रदेश पॉवर जनरेशन कॉर्पोरेशनमध्ये कोळसा आयात करण्यातील गैरव्यवहाराशी संबंधित आहे, असे अधिकऱ्यांनी गुरुवारी सांगितले. भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार सीबीआयने “एफआयआर’ नोंदविला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
2020 मध्ये कडापा येथील “एपीजीईएनसीओ’ने डॉ. नारला टाटा राव थर्मल पॉवर स्टेशन, विजयावदानंद रायलसीमा थर्मापॉवर प्लॅन्टसाठी कोणत्याही बंदरातून 6 लाख मेट्रीक टन कोळशाची आयात करण्यासाठी निविदा मागावल्या होत्या.
नवी दिल्लीतील एनसीसीएफचे तत्कालीन अध्यक्ष वीरेंदर सिंग आणि तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जी.पी. गुप्ता यांनी अदानी एंटरप्राईजेसना करार मिळाल्याबद्दल अनुकूलता दर्शविली होती, असा आरोप आहे.
सीबीआयने “एनआयसीएफ’चे तत्कालीन वरिष्ठ सल्लागार सिंग, गुप्ता, एससी सिंघल आणि अदानी एन्टरप्रायजेस लिमिटेड आणि अन्य अज्ञात अधिकाऱ्यांना “एफआयआर’मध्ये संशयित म्हटले आहे.