जिग्ना व्होरा, पॉलन्स जोसेफ यांच्या दोषमुक्तीला सीबीआयचे आव्हान 

जे.डे. हत्या प्रकरण
मुंबई – पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्याकांडातील प्रकरणी प्रमुख आरोपी जिग्ना व्होरा आणि पॉलन्स जोसेफ यांची निर्दोष सुटका करण्याच्या मुंबई विशेष मोका न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या अपीलाची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने जिग्ना व्होरा विरोधातील अपीलावर 18 मार्च तर पॉलन्स जोसेफच्या विरोधातील अपीलावर तीन आठवड्यानंतर सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले.

11 जून 2011 रोजी जे.डे दुचाकीवरून पवई येथील निवासस्थानी जात असताना मोटार सायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या जे.डे यांचा हिरांनदानी रुगणालयात मृत्यू झाला . ही हत्या छोटा राजनच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार जिग्ना व्होरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरूण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी, पॉल्सन जोसेफ व दीपक सिसोदीया यांना अटक केली आणि त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. विशेष मोका न्यायाधीश एस. एस. अडकर यांच्यासमोर हा खटला चालवण्यात आला. कोर्टानं जिग्ना व्होरा आणि पॉल्सन जोसेफ यांना दोषमुक्‍त केले होते.

मोका न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयने अपील दाखल केले. त्या अपीलावर न्यायमूर्ती न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठा समोर आज सुनावणी झाली. सीबीआयतर्फे विशेष सराकरी वकील प्रदीप घरत यांनी अपीलाची माहिती कोर्टाला दिली. मात्र प्रतिवादींच्यावतीने कोणीही हजर नसल्याने खंडपीठाने जिग्ना व्होरा विरोधातील अपीलावर 18 मार्च तर पॉलन्स जोसेफच्या विरोधातील अपीलावर तीन आठवड्यानंतर सुनावणी
घेण्याचे निश्‍चित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)