नवीदिल्ली – गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे ईडी आणि सीबीआयच्या रडावर आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र प्रत्येक वेळी सिसोदियांची पाठ राखण करताना दिसून येतात. सिसोदिया यांना आता सीबीआयने उद्या ११ वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी एक ट्विट करत मनीष आणि सत्येंद्र यांना थेट आजचे ‘भगत सिंह’ असे म्हंटले आहे.
आपल्या ट्विटमध्ये अरविंद केजरीवाल म्हणतात, ‘जेलच्या सळ्या आणि फाशीचा फंदा भगतसिंग यांच्या उदात्त हेतूंना रोखू शकत नाही. स्वातंत्र्याचा हा दुसरा लढा आहे. मनीष आणि सत्येंद्र हे आजचे भगतसिंग आहेत, 75 वर्षांनंतर गरीबांना चांगले शिक्षण देणारा आणि उज्ज्वल भविष्याची आशा देणारा शिक्षणमंत्री देशाला मिळाला. करोडो गरिबांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत” अशा आशयाचे ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे.
जेल की सलाख़ें और फाँसी का फंदा भगत सिंह के बुलंद इरादों को डिगा नहीं पाये
ये आज़ादी की दूसरी लड़ाई है।मनीष और सत्येंद्र आज के भगत सिंह है
75 साल बाद देश को एक शिक्षा मंत्री मिला जिसने ग़रीबों को अच्छी शिक्षा देकर सुनहरे भविष्य की उम्मीद दी
करोड़ों ग़रीबों की दुआएँ आपके साथ है https://t.co/slc3lb1Mqp
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 16, 2022
मनीष सिसोदिया यांनी देखील त्यांच्यावर पुन्हा झालेल्या छापेमारीची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. ते म्हणतात,माझ्या घरी १४ तास सीबीआय रेड झाली,काहीच सापडले नाही.माझे बँक लॉकर देखील तपासले गेले त्यातही यांना काही सापडले नाही. आता मला सीबीआयने उद्या ११ वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. मी जाणार आणि त्यांना पूर्ण मदत करणार असल्याचे सिसोदिया यांनी यावेळी म्हंटले आहे.
लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी नवीन उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्याचबरोबर 11 उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तेव्हापासून हे मद्य धोरण सीबीआयच्या चौकशीत आहे.