नवी दिल्ली: सीबीआयने मंगळवारी 40 ठिकाणी छापे टाकल्यानंतर गृह मंत्रालयाच्या 6 अधिकाऱ्यांसह 14 जणांना अटक केली. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींकडून अनेक आक्षेप घेण्याजोगे कागदपत्रे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
सीबीआयने मंगळवारी दिल्ली, हरियाणा, राजस्थान, झारखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आसाम आणि मणिपूरमध्ये 40 ठिकाणी छापे टाकले होते.
सीबीआयने छापे टाकल्यानंतर गृह मंत्रालय आणि NIC च्या FCRA विभागाच्या सात लोकसेवकांसह 36 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FCRA विभागातील काही अधिकारी, प्रवर्तक, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि मध्यस्थांसोबत कट रचत होते. FCRA नोंदणी आणि NGO चे नूतनीकरण करण्यासंदर्भातील भ्रष्ट कारवायांमध्ये आरोपींचा सगभाग असल्याचे उघड झालं आहे.
आरोपी विहित निकषांची पूर्तता न करता देणग्या मिळत राहाव्यात, या उद्देशाने भ्रष्टाचार करत होते. तर लोकसेवक FCRA अंतर्गत नोंदणी आणि नोंदणीचे नूतनीकरण तसेच FCRA संबंधित इतर कामांसाठी NGO कडून लाच घेत होते. तपासादरम्यान, दोन आरोपींना गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ लेखापालाच्या वतीने चार लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.