मुंबई : छोटा राजन विरोधात मुंबई पोलिसांनी 1995-98 दरम्यान दाखल केलेल्या आणखी चार गुन्ह्यांचा तपास सीबीआयने हाती घेतला आहे. याबाबात सीबीआयने मंगळवारी स्वतंत्र एफआयआर दाखल केला आहे. हे गुन्हे 95, 96. 97 आणि 98 मधील आहेत. ते वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल होते.
राजन नायर उर्फ बडा राजन याच्याबरोबर काम करत असल्या पासून त्याच्या 1980, 90 आणि 2000 च्या दशकातील पाच आरोपांचा तपास सीबीआयने सुरू केला आहे. त्यात राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याच्यावरील आरोपाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
छोटा राजनला अटक झाल्यानंतर त्याच्यावरील सर्व आरोप सीबीआयकडे हस्तांतरीत करावेत असे आदेश कार्मिक मंत्रालयाने दिले होते. त्याच्यावर देवांग बिपीन पारेख या व्यावसायकाने 28 जुलै 1995मध्ये पहिला गुन्हा नोंदवला होता. त्याच्या फिर्यादित सुरेश (पूर्ण नाव माहत नाही), गुरू साटम आणि छोटा राजन यांनी 20 लाख रुपये खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. शब्बीर पटेल या बांधकाम व्यावसायिकाने छोटा राजनने त्याला आणि त्याच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार 7 जून 1996 रोजी नोंदवली होती. .
बलजित परमात या पत्रकाराने ऍन्टॉप हील पोलिस ठाण्यात छोटा राजनविरोधात फिर्याद दिली होती. त्यात दोन अज्ञात व्यक्तींनी त्याची हत्या करण्याच्या हेतूने गोळ्या झाडल्या. त्यात गंभीर जखमी झाल्याचे म्हटले होते. मात्र गुन्हे अन्वेषण विभागाने तपास करून त्यात छोटा राजन आणि रोहीत वर्मा यांची नावे आरोपपत्रात दाखल केली.
एल टी मार्ग पोलिस चौकीत घिसुला जैन यांनी या व्यावसायिकाने हेमंत कृष्णा वर्तडकर याने 25 रुपये खंडणी मागितल्याच गुन्हा नोंदवला होता. त्या प्रकरणात मुंभई पोलिसांनी तपासाअंती छोटा राजनचे नाव आरोपत्रात समाविष्ट केले होते.
छोटा राजनला अटक करून भारतात आणल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याच्या विरोधातील 71 गुन्हे सीबीआयकडे वर्ग केले होते. छोटा राजन सध्या तिहार कारागृहातील कडेकोट बंदोबस्त असणाऱ्या दोन क्रमांकाच्या बराकीत आहे. तो पुर्वी दाऊदसाठी काम करायचा. 1993मधील बॉम्बस्फोटानंतर त्याच्यात आणि दाऊदमध्ये वैमनस्य निर्माण झाले.