व्हर्टिगो किंवा चक्‍कर येण्याची कारणे

व्हर्टिगो ही एक मेडिकल कंडिशन असून त्यात रक्‍तदाब कमी होण्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. व्हर्टिगोचा अर्थ चक्‍कर येणे, फिरणे. या स्थितीत रुग्णाला डोळ्यासमोर अंधारी येऊ लागते. अशावेळी रक्तदाब कमी होण्याची भीती असते.

अस्थिर किंवा असंतुलित जाणवणे, उंचीची भीती वाटणे, कमी ऐकू येणे, पडण्याची भीती वाटणे, अधिक आवाजाने डोकेदुखी, चक्‍कर येणे. व्हर्टिगोची समस्या ही साधारण व्यायामातूनही दुरुस्त करता येऊ शकते. व्हर्टिगोचे प्रकार असे आहेत…

बीपीपीव्ही – बिनाइन पॅराऑक्‍सिमल पोझिनशनल व्हर्टिगो म्हणजेच बीपीपीव्ही. यात कानातील शिरात कॅल्शियम कॉर्बोनेटचा कचरा जमा होतो. वयस्क रुग्णांत बीपीपीव्हीचे कारण अधिक असते.

मेनियार्स – मोनियार्स व्हर्टिगो हा कानाच्या आतील भाग ऐकण्याच्या शक्‍तीवर परिणाम करतो आणि कानात आवाज येत राहतो. त्यामुळे चक्‍कर येते. कानात साचलेल्या पाण्यामुळे हा त्रास होतो.

वेस्टिब्युलर मायग्रेन – वेस्टिब्युलर व्हर्टिगोचे सामान्य कारण आहे. चक्कर येणे, डोकेदुखी ही सामान्य लक्षणे आहेत. यात रुग्ण हा अतिप्रकाश आणि आवाज सहन करू शकत नाही.
लेब्रिथिनायटिस – ही एक कानातील समस्या आहे ती सर्वसाधारपणे संसर्गाशी निगडित आहे. हा संसर्ग शीरेजवळ कानात सूज येण्यास कारणीभूत ठरू शकते. यामुळे बहिरेपणा येण्याचा धोका असतो.

उपचार – एखाद्या व्यक्‍तला अशक्‍तपणा, चक्‍कर किंवा डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. थेरपीच्या मदतीने रुग्णाची चक्‍कर येण्याची समस्या दूर होऊ शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.