संधीवाताची कारणे व उपाय  

सुजाता टिकेकर 

हिवाळा तसा हेल्दी सिझन पण एक दुखणे मात्र विशेषतः या काळात घरोघरी दिसून येतात….संधीवात, आमवात, स्पॉंडिलायटीस, फ्रोजन शोल्डर, सायटिका, कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखीे. थंडी वाढली की हे आजार वाढतात. हे आजार कोणते ते आपण समजून घेऊ या.या आजारांमुळे शेकपाक, लेप, काढे अन्‌ मग सुरू होतात वैद्यांकडे वारंवार जाणे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संधीवात, आमवात, स्पॉंडिलायटीस, फ्रोजन शोल्डर, सायटिका, कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी हे जीव पिळवटून टाकणारे आजार आहार व पंचकर्म चिकित्साने कमी होऊ शकतात. आपण यासाठी जर आपल्या आहारात विहारात बदल केला तर हे आजार पळून जातील अगदी कोणत्याही वेदनाशामक औषधाच्या अधिक वापराच्या दुष्परिणामाशिवाय!

धिवात या विकारात सांध्याच्या स्नायुंमध्ये प्रदाह होत असते. ही प्रदाहजन्य परिस्थिती सांध्याच्या पेशीमध्ये होणाऱ्या विकृतीमुळे निर्माण होते. ही पेशी म्हणजे अन्य काही नसून एक नाजूक स्पंज रबरासारखी हाडाभोवती आणि सांध्यामाधील पोकळीतील एक गादीसारखी रचना असते. विशेष करून या पेशीमध्ये विकृतीची सुरुवात जेव्हा आतड्यातील स्वस्थ्य अंतर्त्वचा जेव्हा झिजल्या जाते किंवा नष्ट होते तेव्हा सुरू होते. जुनाट बद्धकोष्ठ असणारे बहुतांशी लोक या आजाराचे खरे आमंत्रक असतात.

शरीराकडे तटस्थवृत्तीने पाहा 
आपल्या शरीराकडे जाणीवपूर्वक पाहा. शरीराच्या लहानमोठ्या बदलाकडे तटस्थवृत्तीने पाहायला शिका. शरीर प्रत्येक वेळी सिग्नल देत असते. ते सिग्नल समजून घेण्याची पात्रता अंगी वाणवली तर तुम्हीच तुमचे डॉक्‍टर होऊ शकता. अशाप्रकारे हिवाळ्यात प्रामुख्याने आढळणारे हे सांध्याचे विकार आपण घरच्याघरी आहार विहारात बदल करून आटोक्‍यात ठेवू शकतो. म्हणूनच शरीराचा एक-एक भाग जखडायची सुरवात झाली की समजावे की आपली वाटचाल आमवाताकडे आणि संधीवाताकडे आहे.
तर हा काढा आतड्यात काही काळ राहून स्नायूंना बल देतो.

संधीवाताची कारणे व उपाय 
केवळ बस्ती आणि अभ्यंग, स्वेदन व आहार यामुळे सायटीका, कटीशूल, संधिवात, आजार कमी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

आहारचिकित्सा
आहार चिकित्सा करणेही कठीण तर मुळीच नाही.जर आतड्यातील अंतर्त्वचा स्वास्थ्य ठेवायची असेल तर त्यासाठी कच्चा भाजीपाला, फळे आदी आहारद्रव्यामुळे हे शक्‍य होते. आयुर्वेदानुसार आतड्यात अर्धपक्‍व झालेल्या अन्नामुळे ते आम (अलळव) तयार होते हे सांध्याच्या ठायी संचित होऊन तेथील पेशीमध्ये विकृती निर्माण करते. इंटेस्टिनल फ्लोरामधील विकृतीमुळे आतड्यातील अस्वस्थ्य चयापचयात निर्माण होणारे टॉक्‍सीन्स या संयुक्‍त पेशी (उेपपलींर्ळींश ींर्ळीीीश) यांना प्रभावित करतात असे पाश्‍चात्य वैद्यकीय तज्ञ मानतो. आहाराच्या चिकित्सेतून हाडे सांध्याची दुखणी कमी करता येतात.

ऑर्थोमॉलीक्‍युलर थेरेपी 
शरीराच्या पेशीनपेशी सुदृढ ठेवण्यासाठी पन्नास आहार घटकांची आवश्‍यकता असते. हा आजार आपल्या शरीरातील पेशींना मिळणाऱ्या अन्नघटकांच्या कमतरतेमुळेसुद्धा होतो. काहीवेळा आजार हा आजार नसतो तर ती कमतरताच असते. ती भरून काढली पाहिजे. तरीही आजार वाटलाच तर मग औषधासाठी डॉक्‍टरकडे जावे. ही खरी ऑर्थोमॉलीक्‍युलर थेरेपी आहे. शरीरात खूप काही सिरीयस विकृती नसेल तर आहार चिकित्सा व पंचकर्म चिकित्सा हमखास उपयोगी आहे. या आहार चिकित्सेसंबधी माहिती असल्यावर काही मोजकी औषधे डॉक्‍टरी सल्ल्याने घेतली की बरेही वाटते. औषधे कोणतीही असोत मग ऍलोपथी, आयुर्वेद की होमिओ. अधिक घेणे वाईटच. शरीरातील घडणारी प्रत्येक गोष्ट तुमच्या राहणे, खाणे, बोलणे, वागणे याची प्रतिक्रिया असते. सुदृढ आरोग्याची किल्ली तुमच्याच हाती असते!
संधिवात किंवा वातविकारातील आहार

फळे – डाळिंब, बोरे, द्राक्षे, संत्री, आंबा, कोहळा, चिंच, लिंबू.

दूध – गाईचे व म्हशीचे दूध, तूप, लोणी, खवा.

पाणी – कोमट पाणी.

डाळी – मूग, तूर, उडीद.

भाजी – दुधी भोपळा, पडवळ, कोवळे वांगे, भेंडी.

अन्न – लालसाळी, साठी, तांदूळ, गहू.

कंद – लसूण, कांदा, हळद, आले, कोवळा मुळा

आहारात वापरू नयेत अशी द्रव्ये.

फळ – जांभूळ.

पाणी – अति थंड पाणी ,नदीचे पाणी.
डाळी – चवळी, मूगाचे घट्ट वरण, मटकी, वाटाणे, चणे व मटार.

अन्न – नाचणी, ज्वारी, जव.

कंद – साबुदाणा, रताळे, बटाटे, अळू

अन्य – अति तिखट, सुपारी, खारट पदार्थ, पोहे यासोबतच सर्वांत महत्त्वाचे अपथ्य म्हणजे बद्धकोष्ठता होऊ न देणे होय. वातव्याधीसाठी मलनिर्हरण व्यवस्थित राखणे आवश्‍यक आहे.

उपयोगी असे प्रयोग 

स्पॉंडिलायटीस – मोहरी तेल व भीमसेनी कापूर एकत्र करून मॉलिश करावी. वेदना असणाऱ्या ठिकाणी, ओवा, हिंग, तेल याची जाड पोळी करून गरम गरम बांधावी.

सायटिका – एरंड तेल 10 ते 15 द्रव व सुंठीचे चूर्ण 1 चमचा घ्यावे. तसेच आहारात वांगे, ओवा, हिंग, सेंधेमीठ, सुंठ घालून एरंडतेलात शिजवावी. काही दिवस आहारात ठेवावी. सुंठ चूर्ण काही दिवस 1-1 चमचा जेवणापूर्वी घ्यावे.
पायाचा घोटा दुखत असल्यास- हळकुंड गरम करून वेदना ठिकाणी शेक द्यावी. आळूची पाने तेल लावून गरम करून बांधावी.

कंबरदुखी असल्यास- हळकुंड गरम करून वेदनेच्या ठिकाणी शेक द्यावी. अळूची पाने तेल लावून गरम करून बांधावी. तसेच कंबरदुखी असल्यास तिळतेलाने मॉलिश करून शेकावे. काही आठवडे आठ दिवसांतून एकदा एरंडतेल घ्यावे. पालेभाज्या वातकारक पदार्थ कमी घ्यावे. अधिक त्रास असल्यास आयुर्वेदातील स्नेहन, स्वेदन बस्तीसारखी चिकित्सा करून घेतली आणि आहार विहाराची पथ्ये पाळली, आपली शरीरक्रिया पचनक्रिया उत्सर्जनक्रिया व्यवस्थित ठेवलीत की औषध घ्यायचे काम नाहीच.

लसूणयोग- संधिवात, आमवात, सायटिका, पक्षाघात, कंबर, पाठदुखी, असणाऱ्यांनी हा प्रयोग करणे योग्य ठरते. त्यासाठी लसूण पाकळ्या सोलून घ्याव्यात. त्या रात्रभर ताकात भिजवून ठेवाव्यात. दुसरे दिवशी त्याचा तीव्र गंध गेल्यावर त्या मिक्‍सरमधून किंवा वाटून घ्यावे. त्यात लसणाच्या एक पंचमांश पुढील द्रव्ये टाकावे. त्यामध्ये सैंधव मीठ, ओवा, तुपात तळलेले हिंग, सुंठ, मिरे, पिंपळी, जीरे याचा पुन्हा एकत्र मिश्रण करून त्याचा कल्क गोळा करावा व जेवणापूर्वी चमचाभर दोन वेळा घ्यावा. 2-3 दिवसांचे औषध करून फ्रिजमध्ये ठेवले तरी चालते.शक्‍य झाल्यास रोज ताजे करून घ्यावे. मात्र अजीर्ण झाले असल्यास हे औषध घेऊ नये. काही दिवस वापर केल्यास आराम पडतो.

आमवाताची कारणेः 
जेवण झाल्यावर तीन तासांची पोटाला विश्रांती हवी म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित होते पण तसे होत नाही. त्यामुळे आमवात जडतो. अन्न पक्‍व स्थितीत आंत्राशयातून व पच्चमानाशयातून पचनाचे पुरेसे संस्कार न होता पुढे ढकलले जाते
आहाररसाबरोबर शरीरात फिरणारे रक्‍तही आमस्वरूपी बनते.

पोट साफ नसणे हे एक महत्वाचे कारण आहे.

जडान्न, मेवामिठाई यांचा अतिरेक करणे

दीर्घकाळ बारिक ताप येत राहणे.

संचारी वेदना म्हणजे शरीराच्या निरनिराळया भागात निरनिराळया वेळी दुखणे.

सुरूवातीच्या अवस्थेत सांध्याव्यतिरिक्‍त भाग जखडला जाणे.

सांध्यांचा आवाज येईलच असे नाही.

परसाकडे चिकट होणे, साफ न होणे.

भूक मंदावणे

जीभ चिकट होणे

आळस येणे

उत्साह नसणे.

शरीराच्या सर्व भागावर शोथ म्हणजे सूज.

गरम पाण्याने शेकावेसे वाटणे.

तेल चोळल्याने काही वेळा दुखणे वाढणे

सकाळी उठताना शरीर आंबल्यासारखे वाटणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)