पाचगणी- केळघर, (ता. जावळी) येथील संतोष पांडुरंग पार्टे याला 23 किलो गांजाची तस्करी करताना पोलादपूर येथे पकडण्यात आले आहे. कस्टम विभागाचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना ही कारवाई करण्यात आली.
पार्टेला काल (दि. 18) रात्री अटक करून गांजा जप्त करण्यात आला आहे. या घटनेची तालुक्यात चर्चा आहे. या प्रकरणात पार्टेबरोबर अन्य काही जणांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील केळघर येथे संतोष पार्टेचे सध्या वास्तव्यास आहे. यापूर्वी गांजा विकणाऱ्या दोघांना कोल्हापूर पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी संतोष पार्टेचे नाव समोर आल्याने पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्याच्याबरोबर आणखी काही गांजा तस्कर सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.