मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल (दि. 3) हल्ला झाला आहे. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. आणि संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली असून, या हल्ल्यात देशपांडे त्यांच्या पायाला आणि हाताला मार लागला आहे. पायावर जास्त मार लागला आहे. मात्र, डोक्याला किंवा शरीरावर इतरत्र कुठेही मार लागला नाही.
दरम्यान, हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, मुंबई सारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मनसे कोणते आक्रमक पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा तात्काळ शोध सुरू केला.
Sandeep Deshpande Attacked CCTV : संदीप देशपांडेंवर हल्ला करणारे सीसीटीव्हीत कैद#SandeepDeshpande #ViralVideo #MumbaiPolice #MNS #RajThackeray pic.twitter.com/oXm1dbttWS
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) March 4, 2023
अश्यातच, संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे या सीसीटीव्ही फुटेजमुळे दोन आरोपींचे फोटोही समोर आले आहेत. या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. मुंबई पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी तब्बल आठ पथकं तैनात करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या फुटेजमध्ये एक व्यक्ती हातात स्टंप घेऊन जाताना दिसून येत आहे. काहींनी मास्क घातलेले दिसत आहे. हे फुटेज हल्ल्यानंतरच असल्याचं सांगितलं जातं आहे. एक आरोपी मध्येच पळतानाही दिसतोय. हल्ल्यानंतर या व्यक्तींनी पळ काढत असतानाचा हा व्हिडिओ आहे. सध्या मुंबई पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. त्यामुळे लवकरच हे हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.