समन्वय असल्याने न्यायदान चांगले होते

जिल्हा न्यायाधीश बांबर्डे ः जिल्हा न्यायालयातील 11 न्यायाधीशांना निरोप

नगर – जिल्हा न्यायालयात बेंच आणि बारमध्ये चांगले समन्वय असल्याने नगरमध्ये चांगले न्यायदानाचे काम होत आहे. त्यामुळे नगरमधून बदली झालेले न्यायाधीश पुढील काळात आपापल्या ठिकाणीही नगरप्रमाणेच चांगले न्यायादानाचे काम करतील, अशा भावना व्यक्त करून बदली झालेल्या न्यायाधीशांना जिल्हा न्यायाधीश बांबर्डे यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा न्यायालयातील 11 जिल्हा न्यायाधीशांची इतर न्यायालयात बदली झाली आहे.

वकील संघटनेच्या वतीने बदली झालेल्या सर्व न्यायाधीशांचा जिल्हा न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. शेखर दरंदले, उपाध्यक्ष ऍड. गजेंद्र पिसाळ, सरकारी वकील सतीश पाटील, सचिव ऍड.प्रसाद गांगर्डे, खजिनदार ऍड.राजेश कावरे आदींसह सत्कारार्थी न्यायाधीश एस. आर. नावंदर, के. व्ही. बोरा, पी. पी. बनकर, पद्माकर केस्तीकर, बी. एन. चिकणे, एम. आर. जाधव, जी. जी. इटकर, डी. बी. हंबीरे, ए. एम. पाटणकर, पी. पी. वाघ, जे. एम. देशमुख, आर. एस. शेख व न्यायिक अधिकारी तसेच मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित होता.

न्यायाधीश एस. आर. नावंदर म्हणाले, नगरमध्ये काम करताना मनसोक्त मनमोकळा आनंद मिळाला. त्यामुळे येथून जाताना केलेल्या कामाचे समाधान घेऊन जात आहे. न्यायाधीश पी. पी. वाघ म्हणाल्या, नगरमधील कार्यकाळ कायम स्मरणात इथल्या कामामुळेच मला बढती मिळाली आहे. अनेक दिग्गज वकील नगरमध्ये असल्याने त्यांच्याकडून खूपकाही शिकण्यास मिळाले. न्यायाधीश जे. एम. देशमुख म्हणाल्या, नगरच्या नावाप्रमाणेच नगरचा वकिलांचा बार साधा व सरळ आहे. याची प्रचिती मला आली आहे.

2016 साली कौटुंबिक हिंसाचाराचे 750 खटले होते. मात्र वकिलांच्या सहकार्यामुळे ते आता केवळ 18 राहिले आहे. त्यामुळे नगरमधून चांगल्या कामाचा अनुभव घेऊन जात आहे. जिल्हा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश पद्माकर केस्तीकर म्हणाले, तीन वर्षांपासून जिल्हा न्यायालयात काम करतांना मोठे समाधान वाटले. एकही तक्रार तीन वर्षात आली नाही. सर्व वकिलांनी भरपूर सहकार्य केल्यामुळे चांगले काम करता आले. बार व बेंचमधील घनिष्ठ संबंध नगरच्या जिल्हा न्यायालयात दिसले.

प्रास्तविकात वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. शेखर दरंदले म्हणाले, जिल्हा न्यायालयात चांगले अनुभवी न्यायाधीश मंडळी आहेत. त्यामुळे चांगले न्यायदानाचे काम होत असून, या अनुभवी न्यायाधीश मंडळींकडून खूप काही शिकायला मिळाले. नगरमधून बदली होऊन गेलेल्या न्यायाधीश उच्च पदस्थ होतात, हा अनुभव आहे. त्यामुळे बदली झालेल्या सर्व न्यायाधीश मंडळींना पुढील कार्यास शुभेच्छा व जिल्हा न्यायालयात दिलेल्या योगदानाबद्दल आभार. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.अभय राजे व ऍड. वृषाली तांदळे यांनी केले तर आभार ऍड. प्रसाद गांगर्डे यांनी मानले. यावेळी विशेष सरकारी वकील सुरेश लगड, वकिल संघटनेचे पदाधिकारी ऍड. सुनील आठरे, ऍड. गितांजली पाटील, ऍड. अनुजा काटे, ऍड. प्रणव आपटे, ऍड. कशप तरकसे, ऍड. सुधाकर पवार, ऍड. सुभाष वाघ, ऍड. महेश शिंदे, ऍड. बबन सरोदे, ऍड. अनुराधा येवले, ऍड. विमल खेडकर, ऍड. पी. सी. औटी, ऍड. सतीश सुद्रीक, ऍड. मुकुंद पाटील, ऍड. अनित दिघे, ऍड. मनीष पंडूरे, ऍड. मन्सूर जहागिरदार, ऍड. फारुक शेख, ऍड. अमित गाडेकर आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.