पुणे – देशातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) तसेच नामांकित महाविद्यालयात एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी होणारी कॉमन ऍडमिशन टेस्ट (कॅट) येत्या 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
ही परीक्षा तीन सत्रांमध्ये होणार आहे. साधारण सव्वादोन लाख विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. करोना प्रादुर्भावात परीक्षा सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
परीक्षेचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना हॉलतिकीटसोबतच मूळ ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.
156 शहरांमध्ये असलेल्या विविध केंद्रांवर “कॅट’ आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अधिक माहिती iimcat.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.