एरंडी : कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक (भाग-१)

बहिरट पी . एस.
कार्यक्रम सहायक

लाखे.एम.पी 
विषय विशेषज्ञ (पिक सरंक्षण)
कृषि विज्ञान केंद्र दहीगाव ने

जगामध्ये तेलबियांच्या उत्पादनात एरांडीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो हे पिक विविध उधोग धंद्यात उपयोगी असून,मानवी औषधी निर्मितीत ,विमानाच्या वंगण तेला करीता ,पचनास सह्यक आहे.एरंडी हे पीक अवर्षण प्रवण भागात सुद्धा चांगले येणारे आहे.

साधारण : 400 ते 500 मि.लि. पाऊस पडणाऱ्या भागातही हे पीक येऊ शकते. एरंडी हे पीक जिरायती तसेच बागायती क्षेत्रात घेतले जाते. एरंडी या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जाऊन जमिनीतून अन्नांश व ओलावा शोषून घेत असल्यानेहे पीक अवर्षण भागासाठी योग्य आहे. हे पीक सर्वसाधारणपणे लागवडीखाली असलेल्या सर्वप्रकारच्या जमिनीत येऊ शकते. या सर्व बाबींचा विचार केल्यास एरंडीची लागवड करणे फायदेशीरआहे. एरंडीपासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात म्हणून त्याला निसर्गाचीभेट म्हणतात. एरंड्याचे विविध उपयोग औषधीकरिता व विविध घरकामाकरिता केले जातात. डोळ्यात जळजळ होणे, गुडघेदुखी, अपचन काविळ, त्वचा व हृदयविकार ह्यावर पान, फुल, बियाण्याचेतेल, मुळांचा रस इत्यादींचा उपयोग करता येतो.एरंडी तेलाचा उपयोग औषधी व घरगुती वापराशिवया वंगण, रंग साबणइत्यादी उद्योगात केला जातो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

औद्योगिकदृष्ट्‌या विकसित राष्ट्रांकडून एरंडी तेलास फारमोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तसेच तेल काढल्यावर राहिलेल्या पेंडीचा उपयोग सेंद्रियखत म्हणून केला जात असल्याने तिला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.या वनस्पतीचा प्रेत्यक भागच उपयोग होतो.

पाने: पानांमध्ये प्रथिने 25 टक्के, कर्ब 50 टक्के असते. एरंडीची पाने ‘इरीरेशिम किड्यांसाठी’ एक उत्तम अन्न आहे. जेव्हा ह्या किड्यांना 75 किलो पाने खाऊ घातली जातात. तेव्हा हे रेशीमकिडे 1 किलो रेशीम तयार करू शकतात. हेक्‍टरी एरंडीला 4500 किलो पानं येतात. शेतकरी रेशिम उद्योगात रुचि घेत असल्यास रेशीम किड्यांच्या मदतीने 600किलो रेशिम तयार होऊ शकते. रेशिम किडे वाळलेली पानेसुद्धा खातात. एरंडीची कोवळी पाने जनावरांसाठी उत्कृष्ट चारा म्हणून वापरता येतात. वाळलेल्या पानांचा चुरा मच्छर, पांढरीमाशी इत्यादींना पळवून लावण्याकरिता उपयोगी पडतो, पांढरी माशी इत्यादींना पळवून लावण्या करिता उपयोगी पडतो. पानं गरम करून जेथे दुखत असेल तेथे गरम पान बांधावे असे पुर्णपणे बरे वाटेपर्यंत करावे.

खोड: खोडाचा मुख्यत्वेकरून उपयोग इंधनाकरिता होतो. कोवळी खोडे मोडून जमिनीतगाडली जातात, जेणेकरून जमिनीची प्रत सुधारेल. खोडाचा लगदा लिखाण, छपाई, कागद गुंडाळणेइ. करिता उपयोगी असतो. वाळलेले खोड, फांद्या मातीचे घर बांधण्यात उपयोगी पडतात. खोडाचाउपयोग छतासाठी होतो.

बियाणे: एरंडीची फळे काटेरी व गोलाकार असतात प्रत्येक फळात तीन बिया असतात.बियाण्यांच्या रंगात अतिशय विविधता असते. कोणत्याही दोन बिया सारख्याच रंगाच्या किंवा एकसारख्या नसतात. बियाण्याच्या शंभर दाण्यांचे वजन 10 ते 100 ग्रॅमच्या दरम्यान असते. सरासरी वजन 30 ग्रॅम असते. एरंडीच्याबियाण्यांमध्ये 40 – 55 टक्के तेल, 20टक्के प्रथिने, क्रुड फायबर किंवा सेल्युलोजइ. घटक असतात.

खाद्यपदार्थ म्हणून उपयोग: जरी बियाणे विषारी असले तरी काही विशिष्ट प्रक्रियाकरून त्यापासून ‘ओजिली इसि’ किंवा ‘ओनिटशा किंवा ओजिली उगबा ‘ किंवा ‘अवका’ असे पदार्थपश्‍चिम आफ्रिकेतील देशांमध्ये तयार करतात.

तेल: एरंडीच्या तेलाचे भरपूर व विविध उपयोग असतात. एरंडी तेलाचे एकमेव वैशिष्ट्‌य हे आहे कि त्यात रिसिनोलिक आम्लपदार्थ असतो. ज्यामध्ये हायड्‍रॉक्‍सी (ऍसीड) आम्ल टक्के असते.

औषधी उपयोग: एरंडेल तेलाने अन्नपचन चांगले होते तसेच महिलांच्या गर्भाशयाशीसंबंधित आजार ही बरे होतात, यकृताची क्रिया वेगाने होते. कमी मात्रेत कोमट व शुध्दएरंडेल तेल जसे की लहान मुलांनी 1/2 ते 1 चहाचा चमचा व मोठ्यांनी चहाचे चमचे एक पेलाकोमट पाण्यासोबत प्राशन करावे.

हवामान: एरंडी हे पीक अवर्षणग्रस्त प्रतिसाद देत असल्याने 40 ते 50 सेंमी पर्यंतपाऊस पडणाऱ्या भागातसुद्धा हे पीक चांगले येऊ शकते. एरंडीस उष्ण व कोरडी हवा मानवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)