एरंडी : कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक (भाग-२)

बहिरट पी . एस.
कार्यक्रम सहायक

लाखे.एम.पी 
विषय विशेषज्ञ (पिक सरंक्षण)
कृषि विज्ञान केंद्र दहीगाव ने

जमीन: एरंडीचे पीक सर्वसाधारणपणे लागवडीखाली असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीतयेऊ शकते. भारी जमिनीत हे पीक अधिक कालावधी घेऊन जास्त उत्पादन देते.

पूर्व मशागत: या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जात असल्या कारणाने जमिनीचानांगरट ते सेंमी. खोलवर करावी. त्यावर – फुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगलीतयार करावी, त्यामुळे बियांची उगवण व रोपांची वाढ योग्य प्रमाणात होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लागवड हंगाम बियाण्याचे प्रमाण व अंतर :- जून महिन्यात पावसाला सुरू झाल्यावर जमिनीत पुरेशी ओल व वापसा असतानाएरंडीची पेरणी इतर पिकांबरोबर करावी. पाऊस उशिरा सुरू झाल्यास पेरणी ऑगस्टपर्यंत करण्यासहरकत नाही.रब्बी व बागायती पिकांसाठी प्रेरणी सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत करावी.पेरणी करताना एका ठिकाणी 2 बिया5 टाकाव्यात. पेरणी 7.5 सें. मी. खोलीवर लावावे. पेरणी केल्यानंतर दिवसांनी विरळणी करून प्रत्यके ठिकाणी एकाच रोप ठेवावे. ठेवावे. हेक्‍टरी झाडांची संख्या 30,000 ते 40,000 असावयास पाहिजे.

एरंडीचे बियाणे 24 ते 48 तास पाण्यात भिजवून लावल्यास बियांची उगवण लवकर व जोमदार होते.एरंडीच्या लागवडीसाठी जातीपरत्वे जमिनीच्या प्रकारानुसार मागीलप्रमाणे बियाणेवापरावे.

 अन्नद्रव्य पुरवठा : एरंडी पीक नत्र खताला चांगला प्रतिसाद देत असल्याकारणानेजमिनीच्या मगदुराप्रमाणे नत्राची मात्रा दोन/ तीन हप्त्यात द्यावी.एरंडी पिकाच्या मुळ्या खोलवर जात असल्यामुळे ते अन्नशोषण करणारे पीक आहे. म्हणून हमाखनउत्पादनासाठी माती परीक्षणांवर आधारीत अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. अन्नद्रव्यांचापुरवठा करताना शिफारस केलेल्यापैकी किमान 25 टक्के पुरवठा सेंद्रिय खतातून करावा.

आंतरमशागत: पीक साधारणपणे 15 ते 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी.त्यानंतर शेतात तण असेल तर 10-15 दिवसांच्या अंतराने कोळपणी व निंदणी करून पीक तणविरहीतकरावे.

पाणी व्यवस्थापन: एरंडी या पिकासाठी 50 ते 60 सें. मी. एवढे पाणी पुरेसे होते.म्हणजेच कमी पाऊस पडणाऱ्या भागातदेखील हे पीक चांगले उत्पादन देऊ शकते.

एरंडी हे पीक जास्त पाण्याच्या प्रत्येक अवस्थेला फारच संवेदनशील आहे. यामुळे पिकाच्याआर्थिक उत्पादनासाठी जमिनीत उपलब्ध पाणी, योग्य वाणांचा वापर त्याचप्रमाणे पाणी देण्याचीवेळ व पिकाची वाढीची अवस्था या सर्व बाबी विचारात घ्याव्यात. आधी उत्पादनासाठी बुटक्‍यासंकरीत जातींचा वापर करावा. या जातीस वाढीसाठी जास्त पाण्याची गरज नसते. मात्र भारी जमिनीत दिर्धकाल ओलावा उपलब्ध असल्यामुळे पिकांचा कालावधी वाढतो. हा कालावधी कमी व्हावा, म्हणून फुले येण्याच्या पूर्वी थोड्या कालावधीसाठी पाणी देणे बंद करून ताण देणे गरजेचे आहे. यामुळे पिकाचा कालावधी तर कमी होतोच शिवाय एकाच वेळेला जास्त प्रमाणात फुले येतात व उत्पादनात वाढ होते.

फुले येण्याच्या कालावधीत मात्र पाण्याचा ताण पडता कामा नये.हा ताण पडला तर त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. विशेषत: या पिकाला जमिनीत एकूण उपलब्ध ओलाव्यापैकी 5टक्के पाणी उडून गेल्यावर पाणी दिल्यास हितावह ठरते. यापेक्षा ओलावा जास्त नाहीसा झाल्याने मात्र पिकाच्या उत्पादनात घटयेते.एरंडीची काढणी वेळेवर होण्यासाठी पाणी देण्याची वेळ विचारता घेणे गरजेचे आहे. त्यासाठीया पिकांस काढणीपूर्वी 3 ते 4 आठवडे अगोदर पाण्याची पाळी देऊ नये.

एरंडीची बोंडे तयार झाल्यावर या पिकास पाण्याची गरज नसते. एरंडी या पिकाची इतर पिकाच्या मानाने जमिनीच्याखोल थरातून ओलावा शोषणाची क्षमता जास्त आहे. हे पीक विशेषत: दुष्काळी भागासाठी वरदानआहे.

कीड, रोग व त्यांचा बंदोबस्त : एरंडीवर उंटअळी, शेंडे व बोंडे पोखरणाऱ्या अळीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.अळीचे नियंत्रण करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय करावेत.उंटअळीचा प्रादुर्भाव थोठ्या प्रमाणात असल्यास हाताने अळ्या वेचून घ्याव्यात व रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. पिकाचे सुरुवातीस 1 ते2 महिने उंट अळीपासूनसरंक्षण करावे.

जैविक नियंत्रण: ‘ट्‍रायकोग्रामा चिलोनिस’13.5 सी.सी. प्रति हेक्‍टरी सदरहू कीटकांची अंडी सोडवीत. बोंडे पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी किटकनाशकांची फवारणी करावी. पोखरलेली बोंडे काढून त्यांचा नाश करावा. एरंडीवर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोग आढळून येत नाही. वरील पद्धतीने नियंत्रण न झाल्यास पुढील किटकनाशकांचा वापर करावा.उंट अळी व बोंडे पोखरणाऱ्या किडी दिसू लागताच मोनोक्रोटोफॉस (0.05टक्के) किंवा कार्बारील (0.15टक्के) किंवा क्विनॉलफॉस यांचा 10 -15 दिवसांच्या अंतराने 200 ते 500 मिली लिटर पाण्यातमिसळून प्रति हेक्‍टरी 2 – 3 वेळा गरजेनुसार फवारणी करावी किंवा क्विनॉलफॉस यांचा 10-15 दिवसांच्या अंतराने 200 ते 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्‍टरी 2-3 वेळा गरजे नुसार फवारणी करावी.

काढणी व मळणी: एरंडीचे घड पक्व झाल्यावर पूर्णपणे वाळल्यावर ते तोडून घ्यावेत. 4-5 दिवस वाळवावेत. वाळलेले घड काठीने किंवा मोगारीने बडवून बिया वेगळ्या कराव्यात ववारा देऊन स्वच्छ कराव्यात. जिरायती पिकाची घड काढणी साधारणपणे 2 -3 वेळा करावी. तसेच बागायती पिकाची घड काढणी 4-5 वेळा करावी. अलीकडे मळणीसाठी थ्रेशर उपलब्ध आहेत. मोठ्याक्षेत्रावर जर एरंडीचे पीक असेल तर मळणीसाठी थ्रेशरचा वापर करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)