नगर, (प्रतिनिधी) – देशात जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास कोणत्या समाजाचा किती टक्के वाटा आहे? हे लक्षात येणार आहे.
त्यामुळे मागास राहिलेल्या समाजांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन विकासात्मक वाटचाल करणे सोयीस्कर राहणार आहे.
लोकशाही देशात राहून भाजपचे आमदार नितेश राणे मुस्लिम समाजाला देत असलेल्या धमक्या निषेधार्ह आहे. आरपीआयशी मोठा मुस्लिम समाज जोडलेला आहे.
त्यांच्या सुरक्षेची हमी देखील आरपीआय ने घेतलेली असल्याचे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) जिल्हा कार्यकारिणीची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. गवई बोलत होते.
या बैठकीत अनेक युवक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीसाठी राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, महिला शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, संपदा म्हस्के,
पूजा साठे,कमल वाघमारे, अलका बोर्डे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष दानिश शेख, ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाम शेख, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, शहर जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी नईम शेख, शेवगाव तालुका अध्यक्ष अंकुश कोल्हे, राहुरी तालुका अध्यक्ष लखन सरोदे, शहरजिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी अजीम खान,
युवक शहर अध्यक्ष अमोल खरात, नगर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे, शहर सरचिटणीस विनीत पाडळे, सुफीयान काझी, अक्षय पाथरीया, रवी कानडे, निशांत थोरात, विठ्ठल थोरात, सुधाकर थोरात, प्रणव गायकवाड, मोहित थोरात, अविनाश थोरात, अनिकेत पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. गवई म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात व तालुकास्तरावर विधानसभेच्या दृष्टीकोनाने दौरे सुरु आहेत. राज्यातील सर्वच मतदार संघाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, रिपब्लिकन पक्ष 100 ते 150 जागा लढवण्याच्या विचारात आहे. महाविकास आघाडीकडून सन्मानाने जागा न मिळाल्यास वेगळा निर्णय सुद्धा घेतला जाणार आहे.
महाविकास आघाडीकडून घटक पक्ष म्हणून डावलले गेल्यास वेळप्रसंगी महायुतीकडे जाण्याचा पर्याय देखील निवडला जाणार आहे. शहरासह जिल्ह्यात पक्षाचे काम उत्तमप्रकारे सुरु असल्याबद्दल त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.