जातीच्या आधारावर आरक्षण दिले तर जातीय तेढ निर्माण होईल- राज ठाकरे 

आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर अनेक प्रश्न सुटतील

पुणे: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ‘राजकारण्यांच्या राजकारणाला बळी पडू नका, स्वतःचा जीव गमावू नका, असे आवाहन केले. राज ठाकरे आज पुण्यात आयोजित महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज ठाकरे म्हणाले, “जातीच्या आधारावर आरक्षण दिले तर जातीय तेढ निर्माण होईल. एका जातीला आरक्षण दिले तर दुसऱ्या जातीला द्यावे लागेल. मराठी मुला-मुलींनी या मागचे राजकारण काय सुरू आहे ते समजून घ्यावे. काकासाहेब शिंदे या मुलाने नदीत उडी मारली. अशा प्रकारच्या घटना टाळा, जीव गमावून काहीही होणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरे पुढे म्हणाले, “आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर अनेक प्रश्न सुटतील. सरकार फक्त राजकारण करते आहे, पक्ष कोणताही असो. त्यांच्या राजकारणाला भुलू नका. सरकार तुमच्या भावनांशी खेळत असून त्यांच्या आश्वासनांना आणि राजकारणाला बळी पडू नका” असे आवाहन त्यांनी केले.

https://www.facebook.com/RajThackeray/videos/389254091605746/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)