पुणे – पेट्रोलपंप कर्मचाऱ्याकडील 5 हजार 700 रुपयांची रोकड दुचाकीवरील दोघांनी हिसका देऊन चोरली. या दोघांनाही कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली.
फिर्यादी शांताराम सिताराम सोनने (25, रा.कात्रज) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार माजिद अकबर शेख (19), वृषभ बाबा पिसे (दोघे रा.येरवडा) यांना अटक केली.
फिर्यादी हे कोरेगाव पार्क येथील रोखनी पेट्रोल पंपावर काम करतात. त्या ठिकाणी दुचाकीवरून दोघे आरोपी पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आले होते. त्यांनी फिर्यादीसोबत धक्काबुक्की करून त्यांच्या खिशातील रोकड जबरदस्ती चोरून नेली होती. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चाळके करत आहेत.