कोल्हापूर मध्ये शिरोली चेक पोस्ट वर ६२ लाख ६८ हजार ४४ रुपयांची रोकड जप्त

कोल्हापूर – कोल्हापूर मध्ये शिरोली टोल नाका परिसरात नाका-बंदी दरम्यान ओमनी कार मधून ६२ लाख ६८ हजार ४४ रुपयांची रोकड पकडण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोली एसटी नाका परिसरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना, एम एच ०६ ए एफ २३६१ ओमनी कार मध्ये रोख रक्कम आढळल्याने, पोलिसांनी कारवाई करत पाचगाव येथील शशिकांत भीमा चिगरी (२८) या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सदर रकमेबाबत विचारपूस करून वैध कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता, असमर्थता दर्शविल्याने पोलिसांनी कारवाई करत ही रक्कम कलम १०२ सी आर पी सी प्रमाणे पोलिसांनी जप्त केली आहे. गेल्या पंधरा दिवसातील कोल्हापूर पोलिसांची ही रोकड पकडण्याची चौथी मोठी कारवाई आहे

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.