मंचर – मंचर येथे राहत्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज भरदिवसा चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 24) घडली. विकास सुरेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
विकास जाधव यांच्या घरासमोर राहणारे गणेश निवृत्ती वामन यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंयडा तोडून 50 हजार रुपये रोख रक्कम, 50 हजार रुपये किंमतीची दोन तोळ्यांची सोन्याची साखळी, 35 हजार रुपये किंमतीची सोन्याची कर्णफुले असा एकूण 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे साहित्य आणि आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, एटीएम कार्ड, गॅसकार्ड, वाहन परवाना इत्यादी कागदपत्रे घरफोडी चोरी करुन चोरुन नेले आहेत.