आळंदी -येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेतील खातेदारांचे हजार रुपयांपासून 50 हजारापर्यंत असलेल्या रकमेतून, बॅंकेने खातेदारास कुठलीही सूचना न देता थेट खातेदाराच्या बचत आणि चालूसह विविध प्रकारच्या खात्यामधून पैसे कापून घेतले आहे.
बॅंकेचे ग्राहक प्रमोद भळगट म्हणाले की, बॅंकेकडून अक्षरशः ग्राहकांची लुटमार सुरू आहे. तर बॅंकेचे व्यवस्थापक म्हणाले की, पैसे वरूनच कापले जात आहे. आमचा काही संबंध नाही.
वरील आदेशाच्या अधीन राहून आम्ही काहीच करू शकत नाही असे उत्तर दिले, त्यामुळे आता दाद तरी कोठे मागावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.