धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी केजरीवालांवर गुन्हा दाखल

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आज समाज माध्यमावर धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होत. या व्यंगचित्रामध्ये हातात झाडू घेतलेला माणूस हिंदू धर्मामध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या स्वस्तिकाच्या मागे धावताना दिसत आहे.

या छायाचित्रासोबत अरविंद केजरीवाल यांनी ‘हे कोणीतरी पाठवलं आहे’ असा संदेश देखील लिहिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.