समन्वयाने जबाबदारी चोखपणे पार पाडा

प्रांताधिकारी कांबळे : बारामतीत निवडणुकीबबत आढावा बैठक

बारामती – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे प्रतिपादन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी रविवारी (दि. 22) बारामती येथे केले.

विधानसभा निवडणुकीकरीता वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली असून त्या समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांना कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले, त्यावेळी प्रांताधिकारी कांबळे बोलत होते. यावेळी तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, नगरपरिषद मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे,उपअधिक्षक भूमिअभिलेख शिवप्रसाद गौरकर, पोलीस निरिक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश विधाते तसेच वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या कामाकरीता प्रशासनामार्फत नामनिर्देशन पत्र पथक, आचारसंहिता पथक, भरारी पथक अशा विविध पथकांची स्थापना केली आहे. स्थापन करण्यात आलेल्या सर्व पथकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कालावधीत करावयाच्या कामकाजा बाबत मार्गदर्शन प्रांताधिकारी कांबळे व तहसीलदार पाटील यांनी केले. तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन, एक खिडकी सुविधा, अधिकाऱ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, कामाची कार्यपद्धती याविषयी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलीर व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here