फसव्या सवलतीचे राज्य सरकारकडून गाजर – ढाके

पिंपरी – शहरातील नागरिकांना शास्तीकर वगळून मिळकत कर भरण्यास परवानगी देऊन राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीने फसव्या सवलतीचे गाजर जनतेला दाखविले आहे, असा आरोप सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

नामदेव ढाके म्हणाले की, अवैध बांधकामावर 2008 पासून शास्तीकर नागरिकांच्या माथी मारण्याचे पाप आघाडी सरकारनेच केलेले आहे. करोना साथ रोगाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष बाब म्हणून अवैध बांधकाम शास्ती वगळून मिळकत कर स्वीकृत करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, सरकारने तात्पुरत्या केलेल्या फसव्या सवलतीचे गाजर जनतेला दाखविले आहे.

पालिकेने संपूर्ण शास्ती माफ करण्याबाबत महापालिका सभेचा ठराव पाठविलेला असताना राज्य शासनाने तात्पुरत्या स्वरुपाचा अध्यादेश देऊन शास्तीकराबाबत जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

राज्यामध्ये भाजपचे सरकार असताना 1 हजार चौरस फुटापर्यंतचा अवैध बांधकाम शास्ती, नतंर 2 हजार चौरस फुटापर्यंतचा 50 टक्के शास्तीकर माफ केला होता, असेही नामदेव ढाके यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.